खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड, ( 17 ऑगस्ट ) :
नागभीड -नागपूर रोडवरील राम मंदिर या मुख्य चौकात मनसे पक्षाचे काही कार्यकर्ते होर्डिंग लावत असताना होर्डिंग च्या लोखंडी पाइपचा जवळच असलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या आणि जोरदार आवाज झाला. यात होल्डिंग पकडून असलेल्या आठ ते दहा व्यक्तींना जोराचा करंट लागला.
मात्र त्यापैकी तीन व्यक्ती खाली पडले व त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे. अनावधानाने थोडक्यात बचावले व जीवित हानी झाली नाही. मात्र या घटनेत याठिकाणी भाजीपाला विक्री करणारी एक दुकानदार महिलेला व मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे.
या संदर्भात माहिती होताच विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरातील बघणाऱ्या व्यक्तींनी खुप गर्दी केलेली पाहायला मिळाली. जखमींना ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे हलविण्यात आले आहे.