चंद्रपुरात वाढता कोरोना : आज 203 नवे बाधित : 3 मृत्यू #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात वाढता कोरोना : आज 203 नवे बाधित : 3 मृत्यू #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2547 झाली आहे. यापैकी 1249 बाधित बरे झाले आहेत तर 1269 जण उपचार घेत आहेत.


सोमवारी एकूण 203 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात पुन्हा 3 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यापैकी चंद्रपूर शहरातील बाबूपेठ वार्डातील 55 वर्षीय नागरिकाचा कोरोनाने 30 ऑगस्टला मृत्यू झाला, दुसरा मृत्यू उर्जानगर येथील 45 वर्षीय नागरिकाचा 30 ऑगस्टला मृत्यू झाला, तिसरा मृत्यू बल्लारपूर येथील गांधी वॉर्ड परिसरात राहणारे 65 वर्षीय नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला.


एका मृतकाला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 26 बाधितांचा मृत्यू झाला आहे.


🔴चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2547

🔴24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद

🔴उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1269

🔴1249 बाधित कोरोनातून बरे

चंद्रपूर, दि 31 ऑगस्ट: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 547 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 269 असून आतापर्यंत 1 हजार 249 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.


जिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, बाबुपेठ चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 22 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.


45 वर्षीय ऊर्जानगर चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार होता. 30 ऑगस्टलाच सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.


तर तिसरा मृत्यु हा 65 वर्षीय गांधी वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 29 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 30 ऑगस्टला बाधिताचा अहवाल पॉझिटीव्ह आला उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 26, तेलंगाणा, बुलडाणा व गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.


आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 122, राजुरा तालुक्यातील 13 , वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9 , भद्रावती तालुक्यातील 3 , गोंडपिपरी तालुक्यातील 23, पोंभूर्णा तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 5,  सावली तालुक्यातील 2,  मूल तालुक्यातील 12,  नागभीड तालुक्यातील 4 बाधित असे एकूण 203 बाधित पुढे आले आहे.


चंद्रपूर शहरातील रेस्ट हाऊस परिसर, पटवारी भवन वार्ड नं. 5, बिनबा वार्ड, ऊर्जानगर, रामनगर कॉलनी परीसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, पठाणपुरा वार्ड, जिल्हा कारागृह, दुर्गापुर सिद्धार्थ नगर वार्ड नं. 4, किरमे प्लॉट बाबुपेठ, चेतन गॅस एजन्सी जवळ रामनगर, आकाशवाणी रोड परिसर, साईबाबा वार्ड सिव्हिल लाईन, दुर्गापुर वार्ड नं.1, देना बँक परिसर बाजार वार्ड, बालाजी वार्ड गोपालपुरी, महाराष्ट्र बँक परिसर तुकूम, हनुमान मंदिर परिसर दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड विजय टॉकीज परिसर, दिनकर नगर लालगुडा, कन्नमवार वार्ड अंचलेश्वर गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, बाजार वार्ड चौधरी पॅलेस परिसर,  भिवापूर वार्ड ओम नगर, प्लॉट नं.1 सोईतकर हाऊस परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, खत्री कॉलेज परिसर, जीवन साफल्य कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.


राजुरा तालुक्यातील चूनाभट्टी वार्ड, एरिया हॉस्पिटल सास्ती, देशपांडे वाडी, विरुर स्टेशन वॉर्ड नं. 4 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.वरोरा तालुक्यातील कासमपंजा वॉर्ड, विनायक लेआउट, बोर्डा, नागरी, शेगाव, भागातून बाधित पुढे आले आहे.


बल्लारपूर येथील शांती नगर वार्ड, किल्ला वार्ड, राणी लक्ष्मी वार्ड, मौलाना आजाद वार्ड, कन्नमवार वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, बामणी परिसरातून बाधीत ठरले आहे.


भद्रावती येथील खापरी वार्ड, लुंबिनी नगर विजासन रोड परिसर, कोकेवाडा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील वाढोली, लिखितवाडा, परिसरातून बाधीत पुढे आले आहे.कोरपणा येथील वनसडी, नोकारी पालगाव भागातून बाधीत ठरले आहे. मूल तालुक्यातील वार्ड नं. 15, वार्ड नं. 11, वार्ड नं.14, केळझर, चिरोली, गोवर्धन, भागातून बाधित पुढे आले आहे.