बंद : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा : 2दिवस कार्यालय बंद ! #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बंद : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा : 2दिवस कार्यालय बंद ! #chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 20 ऑगस्ट :

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय 2 दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


जिल्हाधिकारी कार्यालय निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचाही स्वॅब घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकाच्या संपर्कात आलेल्या सगळ्य़ांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.


सोमवारी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्या जागी गुल्हाने यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मंगळवारी म्हणजेच 11 ऑगस्टला गुल्हाने यांनी पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारताच त्यांनी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

सामील व्हा : खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये व वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताज्या महत्वपूर्ण बातम्या