भाजाप मधून हकालपट्टी केलेल्या 2 माजी पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस प्रवेश.* *इतरांचा भारतीय जनता पक्षासोबत काहीही संबंध नाही.* *यांच्या प्रवेशाने भाजपाला कोणतेही नुकसान नाही. भाजपा पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण.#bjp - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजाप मधून हकालपट्टी केलेल्या 2 माजी पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस प्रवेश.* *इतरांचा भारतीय जनता पक्षासोबत काहीही संबंध नाही.* *यांच्या प्रवेशाने भाजपाला कोणतेही नुकसान नाही. भाजपा पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण.#bjp

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी :- 

पंचायत समिती निवडणुकीत पक्ष विरोधी कृत्य व भाजपा जिल्हाध्यक्षांच्या आदेशाच्या विरुद्ध काम केल्या बद्दल पक्षातून हकालपट्टी केलेले माजी तालुका अध्यक्ष व माजी शहर अध्यक्ष यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. 


काँग्रेस मध्ये दाखल झालेले फक्त 2 माजी निलंबित पदाधिकारी हे भाजपचे होते. त्या व्यतिरिक्त दाखल झालेले इतर कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षासोबत कोणताच जुना संबंध नाही. अशी माहिती माजी आमदार प्रा.अतुल देशकर व ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे यांनी दिली आहे.


मागील मार्च महिन्यात नानाजी तुपट व जगदीश तलमले यांना पक्ष विरोधी कृत्य व जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशा विरोधात काम केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ५ महिन्यांच्या राजिकय ब्रेक नंतर आज त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. 


भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे यांच्या सोबत संपर्क साधला असता यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला कोणत्याच प्रकारे नुकसान झालेलं नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातून हकालपट्टी केल्याच्या ४ महिन्यांपासून भाजपशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी या वेळेस सांगितले. व काँग्रेस पक्षात दाखल झालेले इतर कार्यकर्त्यांचा भाजपशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण त्यांनी या वेळेस दिले.