कोरोना चे महासंकट आता ग्रामीण भागातही पोहचत आहे. अलीकडे नागभीड तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजमितीस तालुक्यात एकूण 37 कोरोना रुग्ण संख्या आहे. त्यापैकी नागभीड शहरात ही संख्या 16 वर पोहचली आहे तर ग्रामीण भागात 21 कोरोना रुग्ण झाले आहेत.
कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी चार दिवसाचा जनता करफू सुरु असतांना आज दि. 2 आगस्ट ला एकाच दिवशी 11 कोरोना पॉसिटीव्ह निघाल्याने नागरिकांना आश्चर्याचा चांगलाच धक्काच बसला आहे. आज निघालेल्या रुग्णांपैकी नागभीड शहरातील विविध भागात जसे समता कॉलनी मधील 3, कृषीनगर मधील 1, प्रभाग-5 राममंदीर चौक जवळ 1 असे एकूण 5 कोरोना पॉसिटीव्ह निघाले आहे.
ग्रामीण भागात सावरगाव- 2 , चिकमारा-2, इरव्हा-1 आणि जीवनापूर -1 असे रुग्ण निघाले आहे. तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या मुळे नागरिकांमध्ये भीती सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नागभीड शहरात समुदाय संक्रमित कोरोना रुग्ण सापडत आहे.
त्यामुळे नागभीड मधील वसुंधरा नगर, समता नगर, गोवर्धन चौक, कृषी नगर पूर्णतः शील करण्यात आले आहे. कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी नागभीड मध्ये 4 दिवस जनता करफू सुरु असतांना आज रविवारी 5 कोरोना पॉसिटीव्ह निघाले त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. स्थानिक प्रशाषणही कामाला लागले आहे. दरम्यान कोरोना सेंटर नागभीड येथे स्थानिक व्यापारी, कर्मचारी यांची अँटीजेन टेस्ट सुरु आहे.