ब्रेकिंग : एसडीओ कार्यलय राजुऱ्यातील वनहक्क व्यवस्थापक एसीबीच्या जाळयात : 15000/ -रू ची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पथकाने रंगहान पकडले #ACB - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : एसडीओ कार्यलय राजुऱ्यातील वनहक्क व्यवस्थापक एसीबीच्या जाळयात : 15000/ -रू ची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पथकाने रंगहान पकडले #ACB

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा जि . चंद्रपुर येथिल वनहक्क व्यवस्थापक एसीबीचे जाळयात उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा ता . राजुरा जि . चंद्रपूर येथील वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे क्य ३५ वर्ध यांना १५,००० / -रू ची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पथकाने रंगेहात  पकडले आहे . यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये  प्रचंड खळबळ उडाली आहे.


सविस्तर वृत्त असे की , यातील तकारदार हे मौजा थीप्पा ता . कोरपणा  जि , चंद्रपुर येथील अंदाजे ५ एकर वनजमीन वडीलोपार्जित काळापासून शेती करीता वापरत आहे . वनहक्क कायदान्वये सदर वनजमीनीचा मालकी ताबा मिळण्याकरीता तकारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय , राजुरा येथे रीतसर अर्ज केला होता.


सदर वनजमीनाचा पट्टा तक्रारदार  यांचे नावे करून देण्याचे कामाकरीता उपविभागीय अधिकारी राजुरा येथील वनहक्क व्यवस्थापक झुरमुरे यानी १५,००० / -रू लाचेची मागणी केली , तक्रारारदार  यांना  वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे  यांना लाचरक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार  यांनी लाच लुचपतप्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार नोंदविली.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील पो.नि. श्रीमती वैशाली ढाले यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीचे अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथील वनहक्क व्यवस्थापक यांचेविरुध्द योजनाबध्दरित्या सापळा कार्यवाहीचे आयोजन केले . त्यामध्ये वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे यांनी तक्रारदार सध्या शेती व्यवसाय करीत असलेली वनजमीन वनहक्क कायदयान्वये तक्रारदार यांचे नावे करून देण्याचे कामाकरीता तडजोडीअती १०,००० / - रू . ची मागणी करून स्विकारली.


 त्यावरून वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे , उपविभागीय अधिकारी कार्यालय , राजुरा ता . राजुरा जि . चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे . राजुरा जि चद्रपूर येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली , सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक श्री . राजेश दुद्दलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्री . अविनाश भामरे , पो.नि. वैशाली ढाले , पो.हवा अप्पा जुनघरे , ना.पो.कॉ. ना.पो.कॉ. अजय बागेसर , पो.कॉ. रवि ढेंगळे , रोशन चांदेकर , वैभव गाडगे , व चालक सतिश सिडाम सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी केली आहे . पोलीस अधीक्षक , लाच लुचपतप्रतिबंधककार्याल , नागपूर दुरध्वनीकमांक- ०७१२- २५६१५२० टोलफी . कमांक -१०६४