खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1448 झाली आहे. यापैकी 953 बाधित बरे झाले आहेत तर 480 जण उपचार घेत आहेत.
रविवारी एकूण 94 बाधित पुढे आले आहेत. 22 ऑगस्टला चंद्रपूर शहरातील बाजार वार्डातील 55 वर्षीय नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यांना कोरोना आजार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 13 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.