कोरोना विस्फोट : तब्बल 132 नवे रुग्ण : एकूण संख्या 1799 #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना विस्फोट : तब्बल 132 नवे रुग्ण : एकूण संख्या 1799 #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर,27 ऑगस्ट : 


चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1799 झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 132 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1081 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.




कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. 




सध्या जिल्ह्यामध्ये 696 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1081 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 19 सह एकूण 22 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 




दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



पहीला मृत्यु : मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला श्वसनाचा व अस्थमाचा त्रास तसेच न्युमोनिया असल्याने दिनांक 24 ऑगस्टला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले . 26 ऑगस्टला सकाळी 5:30 वाजता अॅन्टीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला होता . पुढिल उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले . बाधिताला कोरोनासह श्वसनाचा , अस्थमाचा त्रास तसेच उच्चरक्तदाब , न्युमोनिया असल्याने 26 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.


दुसरा मृत्यु : आज 27 ऑगस्टच्या पहाटे दिड वाजता 60 वर्षीय पठाणपुरा वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे . कोविड केअर सेंटर वन अकादमी येथून 5 ऑगस्टला दुपारी 3 वाजता श्वसनाचा त्रास असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले . वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 27 ऑगस्टच्या पहाटे दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनिया तसेच श्वसनाचा व मधुमेहाचा आजार होता . ( गेल्या 24 तासातील है दोन मृत्यु आहेत )