खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -गावचर्चा आधारीत बातमी
गडचांदूर येथील मुख्य शिक्षणसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांची आसपासच्या परिसरातील गावांमध्ये इयत्ता 7 वा वर्ग पास झाल्येल्या विध्यार्थ्यांना आपल्या शाळेत इयत्ता 8 वित दाखल करून घेण्याकरिता घरभेटी सुरु आहेत.
अश्याच प्रकारात गडचांदूर नजीक हरदोना येथे शाळेत दाखल करवून घेण्याकरिता घरोघरी फिरत असलेल्या शिक्षकाने 7 वा वर्ग उत्तीर्ण झालेल्या 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या घरात प्रवेश केला. घरी ती अल्पवयीन विद्यार्थिनी व तिचा भाऊ होता. शिक्षकाने आई वडिलांबद्दल विचारले असता तिच्या भावाने आई बाहेर गेली असल्याचे सांगितल्.
तेव्हा या नराधम शिक्षकाने आई ला बोलावून आणण्यास सांगितले. आई ला बोलविण्यास जात असलेल्या विद्यार्थिनीला घरातच मला तुझ्याशी ऍडमिशन चे बोलायचे आहे सांगून भावाला आई ला बोलविण्यास सांगितले. भाऊ आई ला बोलविण्यास गेला असता या नराधमाने मुलीला आपल्या कडेत घेऊन अश्लील चाळे सुरु केले तेवढ्यात भाऊ घरी पोहोचला व त्याने आरडाओरड सुरु केली. या शाळेतील शिक्षकाने यापूर्वीही अश्या प्रकारचे वर्तन अनेक विद्यार्थिनींशी केल्याची गडचांदूरतिल शैक्षणिक वर्तुळात खमंग चर्चा आहे.
गावात या घटनेनंतर आई वडील व नातेवाईकांनी या शिक्षकाची तक्रार केली असता संस्थेने या गैरवर्तणूक करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्याचे वचन देत कुठेही तक्रार न करण्याची आग्रही विनंती या गणमान्य शाळेलतील मुख्याध्यापकाने केली असल्याचे कळते.
तरीही या संपूर्ण प्रकरणाची गडचांदूर व आजूबाजूच्या गावखेड्यांवर प्रचंड चर्चा असून अनेक पालक या शाळेत मुलांना शिकविण्यास साशंक आल्याचे चित्र आहे शिवाय शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी ही घटना असल्याने अश्या नराधम शिक्षकांना तात्काळ नौकरीतुन बडतर्फ करून विद्यार्थ्यांचे हित जोपासले पाहिजे.