कोरोना चंद्रपूर1249 : दहावा मृत्यू :आज 54 नवे बाधित #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना चंद्रपूर1249 : दहावा मृत्यू :आज 54 नवे बाधित #covid-19

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :  कोरोना बातमीपत्र - 20 ऑगस्ट -

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1249 झाली आहे. यापैकी 851 बाधित बरे झाले आहेत तर 386 जण उपचार घेत आहेत.

गुरुवारी एकूण 54 बाधित पुढे आले आहेत. 19 ऑगस्टला गडचांदूर येथील 52 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 10 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


वाचा सविस्तर वृत्त 👇


⭕️ क्लिक करा - सामील व्हा : खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये


चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1249 वर पोहोचली आहे. यापैकी, उपचाराअंती 851 कोरोना बाधित बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 386 आहे. गेल्या 24 तासांमध्ये नवे 54 बाधित पुढे आलेले आहेत.


जिल्ह्यात 52 वर्षीय गडचांदूर येथील पुरूषाचा मृत्यू झालेला आहे. बाधित कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्त होता. बाधिताला 17 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 ऑगस्टला बाधिताचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केलेले आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 12 असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 10 तर तेलंगाणा राज्य व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुरक्षा रक्षक बाधित आढळल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने स्वतःहून दोन दिवस अलगीकरणात राहणार आहेत. ते विश्रामगृहातूनच कामकाज बघणार असून जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केवळ अत्यावश्यक कामे असणाऱ्यांनीच यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 22, बल्लारपूर येथील आठ, मुल येथील चार, राजुरा, गडचांदूर, कोरपना, सावली येथील प्रत्येकी एक, भद्रावती येथील चार ब्रह्मपुरी येथील 11 तर आसाम येथून आलेला एका बाधिताचा समावेश आहे. असे एकूण 54 बाधित ठरले आहेत.


चंद्रपूर शहरातील तुकूम पोलिस कॉर्टर परिसरातील दोन, खत्री कॉलनी एक, बाबुपेठ दोन, लक्ष्मी नगर एक, जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षारक्षक एक, एसएससी कॉलनी परिसरातील दोन, तर शहरातील इतर भागातील सहा बाधित पुढे आलेले आहेत.


बल्लारपूर येथील पोलीस कॉर्टर परिसरातील तीन, आंबेडकर वार्ड एक, दादाभाई नौरोजी वार्ड एक, बालाजी वार्ड दोन, रविंद्र नगर एक बाधित आढळले आहे.


मूल येथील दोन तर तालुक्यातील कांतापेठ व ताडाळा येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आलेले आहेत. भद्रावती येथील तीन तर तालुक्यातील सुमठाणा येथील एक बाधित पुढे आला आहे.


ब्रह्मपुरी शहरातील एक, हनुमान नगर 2, गांधी नगर 2, सुंदर नगर एक, गुरुदेव नगर 2 तर तालुक्यातील चिखलगाव येथील दोन, बेटाळा येथील एक बाधित आढळलेले आहे.


जिल्ह्यात 21 हजार 154 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 314 पॉझिटिव्ह असून 20 हजार 840 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 762 नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 64 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 607 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.


⭕️ वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 हजार 249 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 26 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 98 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 711 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 312 बाधित, 61 वर्षावरील 72 बाधित आहेत. तसेच 1 हजार 249 बाधितांपैकी 861 पुरुष तर 388 बाधित महिला आहे.


⭕️राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

1 हजार 249 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1144 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.