जिल्हा कारागृहात 1कर्मचाऱ्यासहीत 71 कैदी कोरोना पॉसिटीव्ह? जेल प्रशासनात उडाली खळबळ, इतरही कैद्यांची चाचणी सुरू #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा कारागृहात 1कर्मचाऱ्यासहीत 71 कैदी कोरोना पॉसिटीव्ह? जेल प्रशासनात उडाली खळबळ, इतरही कैद्यांची चाचणी सुरू #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता हा प्रकोप चक्क काराग्रूहात शिरून एका कर्मचाऱ्यांसह 71 कैदी कोरोना बाधित झाल्याने जेल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. 


जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना तुरुंगातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074 आहे तर 1176 कोरोनातून बरे झाले आहेत, 873 वर उपचार सुरू आहे आणि आज 178 बाधितांची नोंद झाली व आता पर्यंत 25 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 


त्यामुळं यावेळेस मोहर्रम जिल्हा कारागृहात गैबी शाह वली यांच्या पवित्र दर्गाह आहे त्यामधे त्यांचे हजारो नागरिक दर्शन घेत असतात. परंतु कोरोनामुळे यावेळचा उर्स रद्द करण्यात आले असल्याने आता चक्क तिथे कोरोना शिरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


कोरोना विषाणू जिल्हा कारागृहात शिरला कसा ? हा प्रश्न अतिशय गंभीर असून 71 कैद्यांची कोरोना चाचणी झाली व ते पॉझिटिव्ह आढळले आणि इतरही कैद्यांची चाचणी सुरू आहे.


अर्थात आता कोरोना चा प्रकोप जिल्ह्यात तर वाढला पण तो कारागृहातील 1 कर्मचारी यांच्यासह 71 बंदिस्तावर झाला त्यामुळे जेल प्रशासनात खळबळ उडाली असल्याचे चित्र आहे.