संवेदना ! झिबली आणी नागाची तेरवी संपन्न : मालकाचा जीव वाचवितांना झिबलीने त्यागले प्राण, नाग आणि कुत्रीची झाली झुंज ! #warora - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संवेदना ! झिबली आणी नागाची तेरवी संपन्न : मालकाचा जीव वाचवितांना झिबलीने त्यागले प्राण, नाग आणि कुत्रीची झाली झुंज ! #warora

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

वरोरा तालुक्यातील एका शेतात नाग आणि झिबली नावाच्या कुत्रीची झुंज झाली होती. या झुंजीत दोघांचाही जीव गेला. 


हे दोन्ही प्राणी स्मरणात रहावे म्हणून त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम मंगळवारी वरोरा तालुक्यातील आकोला क्रमांक 1 येथे चवले कुटुंबियांनी आयोजित केला. चवले परिवाराची ही भूतदया बघून उपस्थित भारावले.
 
चवले कुटूंबीय शेतात काम करित होते. तेवढ्यात सिताबाई उमरे यांच्या शेताकडून एक नाग आपल्या मालकाच्या दिशेने येताना झिबलीला दिसला. आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे पाहून झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीटे झुंज झाली. त्यात दोन्ही जीव गेले होते. झिबली आणि नागाच्या तेरवीचा अनोखा कार्यक्रम शामदेव उमरे यांच्या अध्यक्षतेत झाला. यावेळी पांडूरंग उमरे, रमेश बोरडे, अरूण उमरे, चिंतामण बुटके, विठ्ठल पुसाम, भाऊराव भोगेकर उपस्थित होते.
 
उपस्थितांनी झिबली आणि नागाच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित मंडळींनी झिबलीच्या जिवनावर प्रकाश टाकत हळहळ व्यक्त केली. पाच वर्षीय यश उमरेने तुकडोजी महाराजाचे भजन गाऊन दोन्ही मुक्या जिवांना आदरांजली अर्पण केली. संचालन भास्कर चवले यांनी केले. आभार निखील चवले यांनी मानले. तेरवीच्या यशस्वीतेकरिता अनिकेत चवले, शशिकला चवले, मीना उमरे, प्रतिभा उमरे, सिता उमरे आदींनी सहकार्य केले.