वडसा- ब्रम्हपुरी मार्ग बंद : वाचा काय आहे कारण #Wadsa-Bramhapuri road closed - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वडसा- ब्रम्हपुरी मार्ग बंद : वाचा काय आहे कारण #Wadsa-Bramhapuri road closed

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -

तालुक्यातील हरदोली, चिखलगाव, सुर्बोडि, चिंचोली अन्य नजिकच्या गावातील नागरिक दुध, दही, भाजीपाला विक्रेते व दररोज येणारे नागरिक यांना वडसा येथे येण्यास मनाई केल्याने संतप्त नागरिकांनी हरदोली येथील वैनगंगा नदी काठावर झाडे, गोटे टाकून मार्ग बंद केला. त्यामुळे दोन्ही साइड्वर 1 किमी पर्यंत गाडीची रांग लागून वाहतूक बंद झालेली आहें. घटना स्थळी वडसा व ब्रम्हपुरी येथील पोलिस दाखल झाल्याची माहिती आहें.


ब्रह्मपुरी:- गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातुन ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांना गडचिरोली सीमा मध्ये बंदी घालण्यात आली.व असे प्रत्र सुध्दा काढण्यात आले.पण गडचिरोली जिल्हा हा चंन्द्रपुर जिल्ह्याला लागून असलेल्याने व ब्रह्मपुरी तालुका हा गडचिरोली जिल्ह्याच्या टोकांवर आहे.त्यामुळे अधिकांश शेतकऱ्यांची शेती ही गडचिरोली जिल्ह्यात आहे.

पण गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी ब्रह्मपुरीतील नागरिकांना जिल्हा बंदी घातल्याने या शेतकऱ्यांना मोठें संकट ओढावले.सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी जाऊ देणे हे अत्यआवश्यक सेवेत सामावून घेतले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गडचिरोली सिमेत असणाऱ्या शेतीच्या मशागतीसाठी जात असताना त्यांना परवानगी नसल्याने सिमा पार करता येईना हे किती दिवस चालणार या भावनेने संप्तत शेतकऱ्यांनी आज वैनगंगा नदी पुलीया समोर आजुबाजूचे झाडे तोडून रस्त्यावर टाकले .व वाहतूक जाम केली.गडचिरोली जिल्ह्यातुन सूध्दा ब्रह्मपुरी तालुक्यात एकही वाहन न जावु देण्याचा प्रवित्रा घेतला.पण ब्रह्मपुरी व वडसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ब्रह्मपुरीचे तहसीलदार व वडसाचे तहसीलदार यांच्या चर्चेतुन मध्यस्थी करून अनेक तासांपासून खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

वडसा तहसीलदार यांच्याशी यासंबंधाने चर्चा केली असता . आज संध्याकाळी चार वाजतापासून अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू संबंधित व्यक्ती व वाहनांना प्रवेश देणे सुरू होईल असे त्यांनी सांगितले.