राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार यांच्या पुढाकाराने निधी मंजूर #vijay-wadettiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार यांच्या पुढाकाराने निधी मंजूर #vijay-wadettiwar

Share This

⭕️ब्रम्हपूरी येथील स्विमिंग पुलाचे बांधकाम व सुशोभीकरण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष
⭕️सिंदेवाही येथील नगरपंचायत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी
⭕️सावली शहरात उद्यान व जिमचे  बांधकाम करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष निधी मंजूर

खबरकट्टा / चंद्रपूर - 

ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील शहरीभागाचा टप्याटप्याने  विकास करण्यासाठी या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे आपत्ता व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री  विजय वडेटटीवार यांनी कालबध्द योजना तयार केले होते आणि त्या प्रमाणे संबधित नगरविकास विभागाकडे निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला होता. 

त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यांच्या पुढाकाराने वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत नगरविकास विभाग मंत्रालय यांनी ब्रम्हपूरी नगरपरिषद परिसरात स्विमिंगपुल व उघानासाठी  २ कोटी ५० लक्ष रूपये, सिंदेवाही नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ३ कोटी रूपये तसेच सावली नगरपंचयाच्या उघान व ग्रिम जिमसाठी १ कोटी ५० लक्ष रूपये या प्रमाणे ७ कोटी रूपये निधी दिंनाक १ जुलै २०२० च्या परिपत्राकान्वये मंजूर करण्यात आल्याने ना.विजय वडेटटीवार यांचे सर्वत्र अभिंनदन होत आहे.

           
ब्रम्हपूरी शहरातील परिसरामध्ये स्विमिंग पूलाचे बांधकाम करण्याच्या संदर्भात परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती. याबाबत काही नागरिकांनी निवेदन सुध्दा दिलेले होते. त्यावेळेस ब्रम्हपूरीचे आमदार आणि राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार यांनी लवकरच स्विमिंगपूलाचे बांधकम व उघानाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल आणि विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे शब्द दिले होते. 

त्यांनी ब्रम्हपूरी येथे स्विमिंग पूलाचे बांधकाम करणे व उघानाचे सौदर्यीकरण करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय येथे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नगर विकास विभाग मंत्रालय यांच्या दिंनाक १ जुलैच्या शासन परिपत्रकानुसार वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत ब्रम्हपूरी नगपरिषद परिसरात सुसज्य असे स्विमिंगपुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी रुपये आणि उघानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ५० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

        
सिंदेवाही येथील ग्रामपंचयात बरखास्त करून या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार यांच्या अथक परिश्रमाने नगरपंचायतची स्थापना करण्यात आली होती. या नगरपंचयायतीचे कामकाज ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये सुरू असून कामकाजाच्या दृष्टीने अयोग्य आहे. ही बाब वडेटटीवार यांना माहित होताच त्यांनी नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय येथे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नगर विकास विभाग मंत्रालय यांच्या दिंनाक १ जुलैच्या शासन परिपत्रकानुसार वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत सिंदेवाही येथील आठवडी बाजार परिसरातील गट क्रमांक २८१ मध्ये नगरपंचायतीच्या सर्वसोयीने युक्त सुसज्य अशी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

        
सावली येथील ग्रामपंचयात बरखास्त करून या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार यांच्या अथक परिश्रमाने नगरपंचायतची स्थापना करण्यात आली होती. नगरपंचायतीच्या माध्यमातून या शहराच्या विविध विकासकामे करण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम तयार करून टप्याटप्याने  मोठया प्रमाणात निधी देऊन विकासकाम सूरु केली होती. शहराच्या दृष्टीकोनातुन अघावत असे उघानाचे बांधकाम करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय येथे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नगर विकास विभाग मंत्रालय यांच्या दिंनाक १ जुलैच्या शासन परिपत्रकानुसार वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत सावली येथे  सर्व सोयीने व अघावत असे उघान व जिमचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 

राज्याचे मंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकंमत्री  विजय वडेटटीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपूरी क्षेत्रातील विविध विकासकामासाठी ७ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.