विदर्भ ब्रेकिंग : पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या वाहन चालकाची आत्महत्या !#Upper Superintendent of Police driver commits suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ ब्रेकिंग : पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या वाहन चालकाची आत्महत्या !#Upper Superintendent of Police driver commits suicide

Share This


खबरकट्टा / गडचिरोली -

गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या वाहन चालकाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 7) सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिस संकुल परिसरात घडली. मदन गौरकार (47) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव असून ते 1992 मध्ये गडचिरोली जिल्हा पोलिस दलात रुजू झाले होते.

त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. मदन गौरकार हे गेल्या काही दिवसापासून अप्पर पोलिस अधीक्षक श्री. ढाले यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे श्री. ढाले यांच्या बंगल्यावर गेले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी अचानक रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली. 


त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिस दलातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या तर मुलचेरा येथील एका पोलिस निरिक्षकाने पत्नीची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला.