विद्यार्थ्यांची शाळेला वृक्षांची भेट #tree-plantation-at-kids-zee - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्यार्थ्यांची शाळेला वृक्षांची भेट #tree-plantation-at-kids-zee

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

गडचांदूर येथील किडझी या कॉन्व्हेंट शाळेच्या संचालिका स्नेहल संतोष उपरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संकल्प  सतीश बिडकर यांनी वृक्षांची भेट दिली. 

विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी दिलेल्या या वेगवेगळ्या  वृक्षांचे रोपण शाळा परिसरात करण्यात आले.अत्यन्त कमी वर्षात किडझी शाळेचें  नाव परिसरात नावारूपास आले तेथील शिक्षण विद्यार्थ्यांना खूप सोपी असल्याने व शिक्षकांची विद्यार्थ्यांन मध्ये शिकण्याची  गोळी निर्माण करण्यात सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत ऍक्टिवटी  जास्त प्रमाणात शिकवितात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना कोणतीही अडचण येत नाही उलट विद्यार्थी शाळेत जाणे, अध्यास करणे, जेवण सुद्धा व्यवस्थित करणे याकडे पूर्ण पणे शिक्षकांचे लक्ष अस्तातसे विद्यार्थ्यांचे पालक सतिश बिडकर यांनी सांगितले. यावेळी सतीश बिडकर, संतोष उपरे यांच्यासह या कॉन्व्हेंट शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.