वेकोली कर्मचाऱ्याची हत्या की आत्महत्या? #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वेकोली कर्मचाऱ्याची हत्या की आत्महत्या? #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वेकोली पैनगंगा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत राकेश बेल्लरवार (२८) रा. साखरा यांनी रात्री कामावर असतांना विरुर गाडेगाव रस्त्याजवळील शेल्टर हाऊस मध्ये आत्महत्या केली. सकाळी दरम्यान हि घटना उघडकिस आली. हत्या कि आत्महत्या ? याबद्दल उलट सुलट चर्चा परिसरात सुरु आहे.
वेकोली पैनगंगा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत 28 वर्षीय राकेश बेल्लरवार याने कामावर असतांना शेल्टर हाऊस मध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

विरुर गोरेगाव रस्त्याजवळ हे शेल्टर हाऊस आहे, सकाळी राकेश च्या सहकाऱ्यांना ही बाब समजली असता त्यांनी याची सूचना वेकोली व पोलिसांना दिली.

ज्याठिकाणी राकेशने गळफास लावला आहे, त्यावरून निष्पन्न होते की त्याठिकाणी गळफास घेणं हे शक्य नाही, त्याच्या पायाजवळ टेबल असताना गळफास घेतल्यावर राकेश आपले पाय टेबलावर ठेवू शकला असता, ही हत्या की आत्महत्या हे पोलिसांच्या चौकशीनंतर निष्पन्न होणार.


राकेशला दारूचे व्यसन होते त्याच्या व्यसनाने त्याची पत्नी सुद्धा माहेरी गेली होती अशी माहिती मिळाली आहे.