बेपत्ता इसमाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह#suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बेपत्ता इसमाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह#suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात -

चंद्रपूर शहरालगत असलेल्या माना ओपन कास्ट कोळसा खाणी ला लागून असलेल्या जंगल परिसरात लालपेठ येथील जुन्या वस्तीत असणाऱ्या एका इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

आज काही नागरिकांना जंगल परिसरात इसमाचे शव झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.देविदास गोविंदराव बावसकर असे मृत इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार देविदास बावसकर हा इसम घरून बेपत्ता होता. आज अचानक मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.