राज्याचे माजी वित्त,नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोर्शी जिल्हा अमरावती येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी या राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री असताना अनेक विकासाची कामे या राज्यात केली तसेच अनेक विधायक कामेसुद्धा केलीनागपूर विद्यापीठाला नंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती गाडगे बाबांचे नाव देण्याच्या संसदीय संघर्षाला यश मिळवणारे, राज्यात स्वतंत्र खनिज विकास मंत्रालय सुरु करण्यास राज्य सरकारला भाग पडणारे चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी केलेल्या संसदीय स्पर्धेत यश मिळवणारे, चंद्रपूर जिल्हाची राष्ट्रीय स्तरावर ओळख करून देणारे ३ वर्षात १० कोटी वृक्षलागडीचा विक्रम साधणारे असे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची ख्याती आहे.