जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने विद्यार्थांचे कल जुगाराकडे :- ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची दैनिंय अवस्था.... :- पालकांची चिंता वाढली... :- काही होतकरू विद्यार्थ्यांची पाल्यांना मदत #Students turn to gambling as Zilla Parishad schools are closed - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने विद्यार्थांचे कल जुगाराकडे :- ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची दैनिंय अवस्था.... :- पालकांची चिंता वाढली... :- काही होतकरू विद्यार्थ्यांची पाल्यांना मदत #Students turn to gambling as Zilla Parishad schools are closed

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:- 
 
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आला.पण ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था खुप दैनींय आहे.कारण आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी शेतात काम करत असतात.

विद्यार्थी पानटपरी वर बसून खर्रा घोटताना पाहवयास मिळत आहे.यामुळे विद्यार्थी  वाईट व्यसनाच्या  आहारी जाण्याची शक्यता आहे.गावात गुरूजी असले तर मुलांना भीती वाटत असते . पण या कोरोना महामारी मुळे गुरूजी गावाकडे फीरकत नाही. 

शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश केले.पण ग्रामिण भागात इंटरनेट मोबाईल फोन आणायचा तरी कुठून असा प्रश्न पाल्यांना पडत आहे.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यीं रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

त्यामुळे पाल्यांची सुध्दा चिंता वाढली आहे.जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने ग्रामिण भागात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.पाल्यांना सुध्दा घरी शीक्षणाचे धडे देण्यासाठी वेळ नाही. पाल्यं आपल्या कामासाठी बाहेर जावे लागते.त्यामुळे पाल्यांचे सुध्दा मुलांनवर लक्ष देणं शक्य होत नाही आहे. विद्यार्थी कल आता वाईट व्यसनाकडे जाताना पाहवयास मिळत आहे.