स्कॉलर्स सर्च अकॅडमी चा शंभर टक्के निकाल तर वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल #sscresult - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्कॉलर्स सर्च अकॅडमी चा शंभर टक्के निकाल तर वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल #sscresult

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरपना- नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ग १२ वीच्या निकालात कोरपना येथील स्कॉलर्स सर्च अकॅडमी चा शंभर टक्के निकाल लागला.

यात विज्ञान विद्या शाखेतील स्नेहा राजूरकर हिने ६३.८५ टक्के प्राप्त करून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक दर्शन विधाते ६१.२३ तर तृतीय क्रमांक पूजा देवकते ५९.३८ टक्के  गुण प्राप्त करून पटकाविला. दरवर्षीप्रमाणे यंदा ही उत्तम निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्च फाऊंडेशन चे चेअरमन इंजिनीयर दिलीप झाडे, प्राचार्य राहुल उलमाले व संस्थेचे संचालक, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

⭕️ वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल - 

कोरपना- उच्च माध्यमिक शालांत परीक्षा वर्ग बारावीचा निकाल गुरुवारी  जाहीर करण्यात आला. यामध्ये वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाची उत्कृष्ट परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८८.२७ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक अतुल आत्राम (७६.७६ टक्के) यांनी पटकाविला.तो अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मांगलहिरा येथील रहिवाशी आहे. द्वितीय क्रमांक वैष्णवी देवतळे (६८.९२), तृतीय क्रमांक समाईसा अख्तर हुसेन (६८.३० टक्के) हिने पटकाविला. या परीक्षेत १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत  उत्तीर्ण झाले.
 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे, सचिव भाऊराव कारेकर, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डी जी खडसे , संस्थेचे संचालक व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.