भरधाव पिकअपने तीन चिमुकल्यांना चिरडले, एक ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक गोंडपीपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील घटना #speedy pickup crushed three kids - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भरधाव पिकअपने तीन चिमुकल्यांना चिरडले, एक ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक गोंडपीपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील घटना #speedy pickup crushed three kids

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी : 

तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथे पिकअप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाच्या खाली येऊन तीन चिमुकले गंभीर जखमी झाले. दवाखाण्यात नेताना 7 वर्षीय चिमुकली दगावली. तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 9:30 वाजेच्या सुमारास घडली. आष्टी कडून गोंडपीपरी कडे येणाऱ्या भरधाव पिकअप चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.
यात वाहनाचाही पुढील भाग दुरघटनाग्रस्त झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या आवारात लहान चिमुकले खेळत होती. या मुलावर पिकअप (एमएच ३३ जी ०५६०) घरासमोरील शौचालयाच्या भिंतीला फोडून लहान मुलांच्या अंगावर चढली. 

यात अलेशा पंढरी मेश्राम (७ वर्षे), अस्मित बंडू मेश्राम (१०) रा. नवेगाव वाघाडे, माही बंडू रामटेके (१२) रा. चंद्रपूर या तीन चिमुकल्यांना गंभीर दुखापत झाली. अलेशाला दवाखान्यात उपचारासाठी नेत असतांना तिचा जीव गेला. तर माही आपल्या आजोळी आली होती. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.


घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन चालकास अटक केली असून जखमी मुलांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करत आहे.