माजी तालुका प्रमुख डाॅ. लखन अडबाले यांचा शिवसेनेत प्रवेश #shivsena - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माजी तालुका प्रमुख डाॅ. लखन अडबाले यांचा शिवसेनेत प्रवेश #shivsena

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक राजू डोहे यांच्या प्रवेशानंतर राजुऱ्यात शिवसेनेमध्ये एक नवचैत्यन्य निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

काल धोपटाला कॉलनी येथील युवकांनी प्रवेश घेतला तर आज जिल्हा प्रमुख  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपचे कट्टर समर्थक आणि माजी तालुका प्रमुख डाॅ लखन अडबाले, सास्ती गोवरी क्षेत्रातील कार्यकर्ते  कृष्णा कुंभाला आणि ललि शेरगील राजुरा यांचा प्रवेश झाला.

या प्रसंगी शिवसेनेचे राजू डोहे, माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे,निलेश गंपावार,धर्मेंद्र चौधरी, नगरसेवक राजुरा,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, बंटी मालेकर, माजी सरपंच रमेश कुडे, विभाग प्रमुख अजय साकीनाला, महेश  चन्ने,संदीप भगत, गणेश चौथले, स्वप्नील मोहुर्ले आणि शिवसैनिक  उपस्थित होते.