वेकोली प्रशासनाच्या नियोजनशुन्यतेचा गावकर्यांना फटक. - गोवरी नाल्यालगतचे मातीचे ढिगारे तात्काळ हटवीन्याकरीता शिवसेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन #shivsena - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वेकोली प्रशासनाच्या नियोजनशुन्यतेचा गावकर्यांना फटक. - गोवरी नाल्यालगतचे मातीचे ढिगारे तात्काळ हटवीन्याकरीता शिवसेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन #shivsena

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

राजुरा तालुक्यातील गोवरी  या गावातील नाला सध्या पाणी भरून वाहत असून त्या नाल्यातील पाण्याचा फटका अनेक गावांना बसनार आहे. त्याचे कारण म्हणजे वेकोली प्रशासनाचे नियोजनशून्य काम. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वेकोली मार्फत जमिनीचे उत्खनन सुरू आहे. 

उत्खनामधे निघालेले माती गोवरी गावातील नाल्याच्या पात्रात टाकल्या जात आहे. वेकोली तर्फे हे माती टाकण्याचे काम एका खाजगी कंपनीला दिले आहे. ही कंपनी कुठलेही योग्य नियोजन न करता  मोठ्याप्रमात खोदकामातील निघालेली माती या नाल्याच्या पात्रात आणून टाकत आहे. 

त्यामुळे नाल्याच्या पात्रावरून त्याचा परिणाम होत पात्र लहान झाले. नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झालेली असून अवघ्या एक दोन पाऊसातच हा नाला डुधलिभरुन वाहत आहे.त्यामुळे नाल्याच्या पात्राला व शेजारील गावंना मोठा धोका उढ्भवत आहे. 

त्यामुळे वेकोली प्रशासनाने तात्काळ हे ढिगारे हट्वावे यांकरीता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे ,माजी जिल्हा उपप्रमुख बबन उरकुडे ,चंद्रपुर शहर प्रमुख प्रमोद पाटील ,राजुरा नगर परिषद चे नगरसेवक राजेंद्र डोहे , निलेश गंपावार , वसीम शेख ,अजय साकीनाला यांच्या शिष्टमंडळने चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी स्वप्नील मोहूर्ले ,मनोज कुरवटकर ,महेश चन्ने, सुरेश बुटले आदींची उपस्थिति होती. 

कुठल्याही प्रकारची जीवित हानि होण्याअगोदरच योग्य उपाययोजना कराव्या आणि हे अनैसर्गिक संकट टाळावे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून वेकोली प्रशासन व माती कंपनीला धडा शिकवू असे जिल्हा प्रमुख संदीप गीर्हे व  माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांनी बोलतांना आपले मत व्यक्त केले.