ब्रह्मपुरी नगरषरिषद चे मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा :- आदिवासी समाजा वरील अन्यायाविरुद्ध ब्रम्हपुरी शिवसेनेची पोलिस स्टेशन मध्ये निवेदनाद्वारे मागणी.... :- पुर्व सुचना न‌ देता धव्ज कापले प्रकरण #shivsena - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरी नगरषरिषद चे मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा :- आदिवासी समाजा वरील अन्यायाविरुद्ध ब्रम्हपुरी शिवसेनेची पोलिस स्टेशन मध्ये निवेदनाद्वारे मागणी.... :- पुर्व सुचना न‌ देता धव्ज कापले प्रकरण #shivsena

Share This

खबरकट्टा / ब्रह्मपुरी:- 

आदिवासी समाजातील रंजना सलामे व समाज बांधवांनी गट क्रमांक ४३६ /१ आराजी ०.६४ मौजा ब्रह्मपुरी येथील जागेवर समाजाच्या भावना व्यक्त करण्यासाठी १९/०४/२०१९ ला रितीरिवाजाने आदिवासी समाजाच्या गोंडी धर्माचा कोयकोयतुर ध्वज उपस्थित केला. 

पण एक वर्षानंतर २०/५/२० ला सकाळी दहा वाजता कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता अथवा कोणताही नोटीस न देता आणि कोणतीही मौका चौकशी न करता गोंडी धर्माचा ध्वज कापुन नगरपरिषद कार्यालय मध्ये जमा केले.
ब्रह्मपुरी नगरषरिषद चे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना कोणत्याही व्यक्ती व जाती धर्माचा अपमान करणे उसापस्थान किंवा पवित्र वस्तू नष्ट करणे एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.कोणत्याही समाजातील बांधवांच्या भावना दुखावण्याचा काही अधिकार नाही.

आदिवासी समाजाच्या भावना दुखावुन अन्याय केला आहे.३१/५/२० ला मुख्याधिकारी यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली.पण कोणत्याही प्रकारची मौका चौकशी करण्यात आली नाही.तरी संबंधित प्रकरणी लक्ष घालून कलम२९५व ३९५ (अ) आदिवासी धार्मिक अपराध प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार कलम ३(१)(४१५), कलम ३(१)(९)कलम ३(१)(१०) अन्य नवे गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आदिवासी समाजातील नागरिकांना न्याय नाही मिळाले तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशी चेतावणी पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देता वेळी रिंकुभाऊ पठाण तालुका संघटक शिवसेना ब्रह्मपुरी,मिंलीद भणारे शिवसैनिक,आशू गाडगिलवार, आकाश शेन्दै, अमोल माकोडे,पराग माटे, अमोल ठिकरे उपस्थित होते.