राजुरा भाजपचे माजी तालुका प्रमुख नगरसेवक राजूभाऊ डोहे आणि निलेश गंपावार यांचा कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश #shivsena - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा भाजपचे माजी तालुका प्रमुख नगरसेवक राजूभाऊ डोहे आणि निलेश गंपावार यांचा कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश #shivsena

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

काल दि.04-07-2020 रोज शनिवारी शिवसेनेचे  महाराष्ट्र  राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे  चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील कृषी क्षेत्रा संबंधीचा आढावा त्यांनी घेतला. 

शिवसेना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.माजी उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांच्या समन्वयातून राजुरा भाजपचे माजी तालुका प्रमुख तथा नगरसेवक राजूभाऊ डॊहे आणि सदस्य निलेश भाऊ गंपावार यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशानंतर राजुरा शिवसेनेमध्ये एक उत्सहाचं वातावरण तयार झाले आहे.राजुरा शिवसेनेमध्ये मोठे राजकीय बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रसंगी जिल्हा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद पाटील. युवासेना समन्वयक निलेश बालखेडे, उपतालुका प्रमुख बंटी मालेकर,उपतालुका प्रमुख रमेश झाडे,  उपतालुका प्रमुख वासुदेव चापले, माजी सरपंच रमेश कुडे, महेश चन्ने, सुरेशभा़ऊ बुटले राजुभाऊ येरावार बालुभा़ऊ कुईटे, देवाभाऊ येवले, बापुभाऊ चौ़धरी, गणेश चोथले आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.