सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शाळा सुरु : #school-open - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शाळा सुरु : #school-open

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नागभीड तालुक्यात नऊ शाळांमध्ये  9 वी व 10 वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहे. धडा घेत आणखी काही शाळा आणखी काही शाळा आपल्या शाळेत वर्ग सुरू करतील, असे बोलले जात आहे.

नागभीड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय गोविंदपूर, अरूणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, प्रशांत विद्यालय किटाळी, सरस्वती विद्यालय कोजबी, मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, कृषक विद्यालय कोटगाव, समता विद्यालय पाहार्णी आणि धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव या त्या शाळा असून या शाळांनी आपापल्या शाळेत ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरू केले आहेत. 

तालुक्यात काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह एकूण ४३ माध्यमिक शाळा आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करावयाच्या की नाही, या विवंचनेत त्या त्या ठिकाणचे शाळा प्रशासन आहे. अशातच तालुक्यातील नऊ आपापल्या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग सुरू केले आहे.