ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदासाठी आणखी एक आदेश, आता यांनाच मिळणार संधी :#sarpanch - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदासाठी आणखी एक आदेश, आता यांनाच मिळणार संधी :#sarpanch

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : चंद्रपूर -

राज्यातील 25 जुन रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचयातीवर प्रशासक नेमण्याच्या राज्यपालांच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्रालयाने आणखी एक आदेश काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदासाठी नियुक्त राज्यातील 25 जुन रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचयातीवर प्रशासक नेमण्याच्या राज्यपालांच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्रालयाने आणखी एक आदेश काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदासाठी नियुक्त करावयाच्या व्यक्तींसाठी त्या-त्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण कायम ठेवण्यास सांगितले आहे. याबाबतचे लेखी आदेश ग्रामविकास मंत्रालयाकडून काढले आहेत. 

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना अनुसुचित जाती व जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांपैकी ज्या प्रवर्गासाठी ज्या ग्रामपंचायतीत जे आरक्षण आहे, त्याच प्रवर्गातील आरक्षणानुसार प्रशासक नेमण्याचे अधिकार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिल्याचे एक पत्र ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीम यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना काल (ता. 15) काढले. या पत्राची प्रत सर्व जिल्हा परिषदांनाही देण्यात आली. त्यानुसार कालपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडून प्रशासकीय कार्यवाहीही सुरू करण्यात आली. 

याबाबत  जिल्हा परिषदेकडूनही याबाबत दुजोरा देण्यात आला. याबाबत काल रात्री उशिरापर्यंत ग्रामविकास मंत्रालयाशी संवाद चालू असताना हाच आदेश कायम असल्याचे सांगण्यात आल्याने जिल्हा परिषद प्रशासन पुढील प्रशासकीय कार्यवाहीस लागल्याचे सांगण्यात आले. 

पर्यायाने योग्य व्यक्तीची निवड, महाविकासआघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींवर त्याच पक्षाचा प्रशासक नेमण्याच्या पक्षपातळीवरील आदेश, अशा एका मागून एका आदेशांचा धडाका सुरू आहे. 

दररोज नव्या निकषांमुळे प्रशासकपदाबाबतचा सस्पेन्स रंजक होत असताना कोणत्या ग्रामपंचायतीवर कुण्या पक्षाचा प्रशासक, याबाबत अजुन तरी तीनही पक्षांच्या तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिका-यांचा सुसंवाद एकदमच छान आहे. प्रचंड प्रमाणात येत असलेले इच्छुकांचे अर्ज आणि त्यांच्या शिफारशींसाठी येणारे फोन यामुळे सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षही हैराण झाले असून, यादी फायनल करताना खरा कस लागणार आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात तीनही पक्षांचे तालुकाध्यक्ष एकमेकांच्या हल्ली चांगले संपर्कात आलेले असून, तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचाही दररोज संवाद-संपर्क आहे व गावस्तरावर योग्य व्यक्तीची निवड करत शासकीय कार्ययंत्रणा बळकट करण्यास भक्कम हातभार लावू अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिली. 

तसेच, प्रत्येक गावाचा ग्रामपंचायत कारभार उत्तम व्हावा असाच सक्षम प्रशासक नेमण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असून तीनही पक्षांच्या सर्व पदाधिका-यांचा उत्तम संवाद घडवून आणण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार लवकरच महाविकास आघाडी पक्ष घटकांची बैठक घेऊन अध्यादेशातील मापदंडानुसार योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती चंद्रपूर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनीही सांगत समन्वय सूचक दुजोरा दिला.