थेट सरपंच होण्याची सुवर्णसंधी !: तुम्ही योग्य व्यक्ती असाल तर गावचे सरपंच होऊ शकता;राज्यपालांच्या नव्या आदेशानं गावागावात एकच चर्चा #sarpanch - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थेट सरपंच होण्याची सुवर्णसंधी !: तुम्ही योग्य व्यक्ती असाल तर गावचे सरपंच होऊ शकता;राज्यपालांच्या नव्या आदेशानं गावागावात एकच चर्चा #sarpanch

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

तुम्ही योग्य व्यक्ती असाल तर गावचे सरपंच होऊ शकता; नव्या आदेशानं गावागावात एकच चर्चा 

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न करता गावातील योग्य व्यक्तीची निवड केली जावी, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.या निर्णयाचा परिणाम म्हणून गावातील सर्वसामान्य नागरिकालाही आता ग्रामपंचायतीचा कारभार पार पाडण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनाचा प्रतिनिधी बसवणार असल्याचं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी घोषित केलं होतं. राज्याची दोन्ही सभागृहे बंद असल्यानं याबाबत आदेश निघू शकला नाही. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशासकपदावर गावातील योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याचा आदेश नुकताच जाहीर केला आहे.

दरम्यान, गावातील राजकारणात अनेकजण संधी मिळावी यासाठी धडपडत असतात. गावातील आता अनेकांनी प्रशासक पदी वर्णी लागवी यासाठी नेत्यांना साकडं घालायला सुरूवात केली आहे. म्हणूनच सरपंच पदाच्या स्पर्धेसारखीच या प्रशासकाच्या स्पर्धेलाही बरीच रंगत येणार अशी चर्चा आता वर्तविली जात आहे.