तोतया उत्खनन अधिकारी प्रकरणात एकास अटक; मुख्य सुत्रधार प्रिया झामरे मात्र फरारचतब्बल विस दिवसानंतर आरोपी अटकेत #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तोतया उत्खनन अधिकारी प्रकरणात एकास अटक; मुख्य सुत्रधार प्रिया झामरे मात्र फरारचतब्बल विस दिवसानंतर आरोपी अटकेत #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्गुस -

वाळू तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या महिलेविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात झामरे ब्रदर्स नावाच्या गाडीचाही उल्लेख पोलीस तक्रारीत होता. या गाडीचा मालक आरोपी विक्रांत उर्फ विक्की परमेश्वर झामरे (39) रा.संतोषीमाता वार्ड  बल्लारशाह यास शुक्रवार(10 जुलै )ला मध्यरात्री घुग्घुस पोलीसांनी अटक केली आहे तर इतर आरोपी फरार आहेत. 

पैश्याची देवान-घेवान करनारे रेती तस्कर मात्र मोकाटच आहे आता पर्यंत महसुल प्रशासनाने कोणतीच कारवाही केली नाही वढा येथील हजारों ब्रास रेती साठा गजानन वरारकर यांच्या शेतात जमा केलेला जप्त केला नाही व कोणतीच कारवाही केली नाही  त्यामुळे महसुल प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

गेल्या 19 जून शुक्रवारला घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा येथे ऊत्खनन अधिकारी असल्याची सांगुन वाळू तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या तोतया महिला व तिच्या साथीदारांचा व्हीडीओ वायरल झाला. घुग्घुस परिसरातील रेती तस्करांनी आपला मोर्चा वढा नदीच्या रेती घाटांवर वळविला आहे.

घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा गावाच्या वाळू घाटांवरुन अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर ट्राली द्वारे सुरु होती.
हिच संधी साधुन प्रिया झांबरे महिलेने स्काॅर्पीओ क्रमांक एमएच 34 बीएफ 4449 मध्ये तिन इसमांना सोबत घेऊन वढा गावात दाखल होऊन त्यांनी गावचे पोलीस पाटील किसन वरारकर यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व आम्ही उत्खनन विभागातुन आलो आहे, असे सांगितले. 

पोलीस पाटील येताच त्याच्या सोबत वाळू घाटांवर जाऊन एक ट्रॅक्टर पकडले व त्यालाही तेच सांगुन ट्रॅक्टर लावण्याची धमकी दिली. त्या ट्रॅक्टर धारकाकडुन हजारों रुपयाची मोठी रक्कम वसुल करुन तथाकथितांनी पोबारा केला.

“भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर व जिल्हा उत्खनन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांचे आदेश मिळताच तथाकथित एका महिलेची व तिच्या तिन सहकारी विरुद्ध पोलीसांत तक्रार दिली."यात पैश्याची देवाण घेवाण करनारे वाळू तस्कर व तोतया उत्खनन अधिकारी महिला व तिचे सहकारी अडकण्याची दाट शक्यता आहे.
 

वाळू तस्करांवर ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान घुग्घुस परिसरातील वाळू तस्करीमुळे सर्वसामान्यांचा प्रशासनावर रोष प्रचंड तिव्र झाला आहे.