नायब तहसीलदार धांडे यांच्यावरील वाळूमाफियांच्या हमला प्रकरणात गुन्हा दाखल : चार वाहने जप्त : वाळू तस्करांना राजकीय पाठबळामुळे उरले नाही भय???? #sand-trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नायब तहसीलदार धांडे यांच्यावरील वाळूमाफियांच्या हमला प्रकरणात गुन्हा दाखल : चार वाहने जप्त : वाळू तस्करांना राजकीय पाठबळामुळे उरले नाही भय???? #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

काल बुधवार दिनांक एक जुलै रोजी पठाणपुरा गेट जवळील जमणजट्टी परिसरातील नदीच्या पात्रातून रेतीची तस्करी करताना चंद्रपूर चे नायब तहसीलदार राजु धांडे व त्यांच्या चमुंनी धाड टाकली असता त्या ठिकाणी रेती डोहाळतांना त्यांना काही इसम व ट्रॅक्टर दिसले, त्यातीलच साबिर व जहांगीर सिद्धीकी यांनी त्यांच्यावर हमला केला, या हल्ल्यानंतर तहसील विभागाने चार ट्रॅक्टर जप्त केले व राजु धांडे यांच्या तक्रारीवर साबीर व जहागीर सिद्दिकी, रा. लालपेठ कॉलरी, चंद्रपूर यांच्यावर भादंवीच्या 353, 332, 186, 34 व 506 अंतर्गत चंद्रपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


याप्रकरणी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच-३४-एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच-३४ एबी ३०९०, राकेश देशमुख यांच्या मालकीच्या एमएच-३४ एल ८८५७ क्रमाकांच्या ट्रॅक्टर रेती तस्करी सुरू होती.या पथकाने वाहनांच्या मालकांवर कारवाई करीत वाहन जप्त केले.

याच दरम्यान जहागीर सिद्धीकी याच्या मालकीचा एमच-३४-४००६ या क्रमांकाच्या हॉफटनद्वारे रेती तस्करी करीत असताना पथकाने ट्रकला पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला असता हा हल्ला करण्यात आला.

महत्त्वाचे म्हणजे चोरांना आज आम्ही चुकी करत आहोत याची भीती नाही, आम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे असे वाटत आहे. हे समाजासाठी व कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक आहे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्वाचे आहे.