अ‍ॅड. संजय धोटे यांनीं जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केल्या राजुरा निर्वाचण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अ‍ॅड. संजय धोटे यांनीं जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केल्या राजुरा निर्वाचण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या #rajura

Share This

⭕रासायनिक खते व औषधी चा पुरवठा त्वरित करा
⭕देवाडा येथील आदिवासी सेवा सहकारी संस्था तर्फे शेतकऱ्यांचे शोषण थांबवा
⭕सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा त्वरित द्यावा
⭕आदिवासी सेवा सहकारी संस्थांतील शेतकऱ्यांना शेअर्सच्या रक्कमेचा लाभ त्वरित देण्याचीही मागणी

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
 
राजुरा निर्वाचण क्षेत्रातील चार तालुक्यात शेतकऱ्यांना वेळेअभावी रासायनिक खते व औषध मिळत नसल्याची व  आदिवासी सेवा सहकारी संस्था देवाडा येथील अनियमित व्यवहार व शेतकऱ्यांचे होत असलेले शोषण  जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ध्यानात आणून देत योग्य उपाययोजना करण्यास सुचविले आहे. 

वास्तविक बघता कुषी केंद्र मध्ये रासायनिक खते व औषध चा तुटवडा  असून  त्यांच्या मागणी नुसार खते मिळत नसल्याची तक्रार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना सद्यस्थितीत रासायनिक खतांच्या व औषधी करिता दुकानात जाऊन परत यावे लागत असल्याने पेरणी व शेतकरी हंगामात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे सांगितले. 

राजुरा निर्वाचण क्षेत्राकरिता आजच्या स्थितीत 4200मेट्रीक टन पेक्षा जास्त खते उपलब्ध करून द्यावित जेनेकरुण सर्वत्र तालुक्यातील शेतकऱ्यांना खते मिळाल्याने दिलासा देणारी बाब ठरेल असे सांगितले. जास्त प्रमाणात कालावधी झाल्यास शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण या हंगामात पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या पुर्ववत कामाच्या ठिकाणी खते घेऊन जाण्यास पण त्रास सहण करावा लागू शकतो. या संदर्भातील गरज लक्षात घेता त्वरित हि मागणी पुर्ण करावी अशी विनंती प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे करण्यात आली.

 
तसेच राजुरा निर्वाचण क्षेत्रातील सेवा सहकारी संस्था नी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा त्वरित करून शेतकऱ्यांचे शेअर्सच्या रक्कमेचा लाभ त्वरित द्यावात म्हणून सांगितले.वास्तविक. बघता शेतकरी वर्ग  सेवा सहकारी संस्था मधिल सहकारी संस्था शेती कर्ज वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत  दरवर्षी मे, जुन महिणा मध्ये कर्ज देतो वा मार्च मध्ये कर्ज  उचलना शेतकरी भरणा करतो. यापूर्वी एकरी 18000रुपये कर्ज द्यायची  आता एकरी 22000 रुपये कर्ज शेतकऱ्यांना देते.            

कर्ज देताना च दरवर्षी शेतकऱ्यांचे शेअर्स 3टक्के दराने दिलेल्या रक्कमेवर  सोसायटीच्या द्रारा मध्यवर्ती बँकेत जमा होते.सोसायटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रण खाली येत असून दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे शेअर्स ची रक्कम एकतर 20000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांचे जमा झाल्यास परत शेतकऱ्यांना करायचे असे नियम ठरले आहे.       

आदिवासी सेवा सहकारी संस्था देवाडा चे कर्ज दार शेतकरी यांनी अनेकदा शेतकऱ्यांनी संस्था चे सचिव व जिल्हा मध्यवर्ती बँका राजुरा कडे  अनेकदा शेअर्स रक्कमेची परतीची मागणी केली .परंतु पंधरा वर्षांत एकदाही ही रक्कम शेतकऱ्यांना परत केली जात नाही वा दिली नाहीत. 

असे प्रकार सर्व तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मध्ये आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांचे शेअर्स किती जमा झाले हे दाखवणारे रेकॉर्ड ,पावती ,किवा तत्सम प्रमाणपत्र सुध्दा शेतकऱ्यांना दिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे करोडो रुपयाचे नुकसान होत आहेत. शेतकऱ्यांचे व्यवहार बाबत सहकारी बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कारभारत पारदर्शकता दिसून येत नाहीत.              


शेतकरी आपल्या अधिकारा पासून वंचित असुन त्याचे शोषण केल्या जात आहे. हा सर्वत्री अन्याय असून  या बाबतीत चौकशी होणे आवश्यक आहे. व शेतकऱ्यांना उपरोक्त रक्कम परत मिळणे न्यायोचित आहेत. या संदर्भातील त्वरित चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावात हि मागणी संजय धोटे माजी आमदार राजुरा यांनी केली.