राजुरा शहरात एड. यादवराव धोटे महाविद्यालयाचे घव-घवित यश #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा शहरात एड. यादवराव धोटे महाविद्यालयाचे घव-घवित यश #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

शहरातील नामांकित अड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालीत अड. यादवराव धोटे कनिष्ट महाविद्यालयात मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १२ वि परीक्षेच्या निकालात यंदाही यशाचा इतिहास रचला व उकृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली विद्यार्थांनी उत्तम यश प्राप्त केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत. महाविद्यालयाची टक्केवारी ८९.२८ असून सम्पूर्ण महाविद्यालयातून विज्ञान शाखेचा विदयार्थी निशांत अनंत रासेकर याने ८६.६१ टक्के घेऊन प्रथम येऊन महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला. 
ह्या महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.३८ टक्के, कला शाखेचा निकाल ६७.४६ टक्के व वाणिज्य शाखेचा निकाल ९३.५४ टक्के लागलेला आहेत. विज्ञान शाखेतून रुपेश उरकुडे ८१.८४ टक्के घेऊन द्वितीय आला तर सुप्रीत नरेंद्र वैरागडे ७९.३८ टक्के घेऊन तृतीय आला. तसेच कला शाखेतून कु. मुमिक्षा मारोती मून हिने ८२.९२ टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला तर कु. अर्पिता प्रकाश मोहारे व कु. शिवानी मोरेश्वर माथनकर यांनी ७६.४६ टक्के गुण घेऊन कला शाखेतून द्वितीय क्रमांक घेतला. तर कु. अरीश्मा संतोष कुकुडकर हिने ६९.०७ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेतून कु. शुभांगी राजू आकनुवार ७९.५३ टक्के गुण घेऊन प्रथम आली. तर कु. रजनी रोगे ७८.६१ टक्के गुण घेऊन द्वितीय आली तसेच कु. पायल बल्की हिने ७४.७६ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
या गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्क्रूष्ठ कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीरभाऊ धोटे, उपाध्यक्ष एड. संजयभाऊ धोटे, कोषाध्यक्ष श्री. सातीशभाऊ धोटे, सचिव एड. अर्पित धोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दिनेश दुर्योधन, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. सुप्रिया गोंड तसेच परीक्षा विभाग प्रमुख प्रा. इर्शाद शेख सर तसेच प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन करून  पुढील उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्यात.