कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्य पंचायत समिती राजुरा व तालुका कृषी अधिकारी राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन आज पंचायत समिती  राजुरा अंतर्गत विहीरगाव येथे  श्री. बृहस्पती साळवे यांचे शेतामध्ये करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष  पंचायत समिती चे सभापती सौ.मुमताज जावेद ,प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद चंद्रपूर चे कृषी व पशू सवर्धन सभापती श्री. सुनील उरकुडे,प.स.उपसभापती श्री.मंगेश गुरणुळे,माजी आमदार श्री.सुदर्शन निमकर,प.स.सदस्य श्री.तुकाराम माणूसमारे , उपविभागीय कृषी अधिकारी श्री.गोविंदराव मोरे,तालुका कृषी अधिकारी श्री.कडलक ,प्र.सहा. गट विकास अधिकारी श्री. डाखरे ,  कृषी अधिकारी पंचायत समिती श्री.   ढवस,श्री. अ. जावेद, सरपंच सौ.करमणकर, उपसरपंच श्री. इर्शाद शेख इत्यादी मान्यवरांच्या  उपस्थितीत पार पडला. 

सदर कृषी दिनाचे औचित्य साधून विहीर गाव येथे शेतकऱ्याच्या बांधावर कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाची सुरवात हरितक्रांती चे जनक व माझी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करुन सुरवात करण्यात आली. या प्रसंगी बृहस्पती साळवे व कवडू बोधे या शेत कर्यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच कृषी सभापती व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. 

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे प्रतिपादन श्री. उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन  कृषी विस्तार अधिकारी श्री. नरेंद्र पेटकर यांनी तर उपस्थितांचे आभार श्री.सूर्यवंशी ग्रामसेवक विहिरगाव  यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  श्री.चुनने कृषी विस्तार अधिकारी तसेच  ग्रामपंचायत विहीर गाव पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी व कृषी विभागातील सर्व कर्मचा र्यानी अथक परिश्रम घेतले.