राजगृहा वरील भ्याड हल्ला करणार्‍यावर कठोर कारवाई करा :सामाजिक संघटना, रिपब्लिकन पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहरातर्फे मागणी #rajgruh-attack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजगृहा वरील भ्याड हल्ला करणार्‍यावर कठोर कारवाई करा :सामाजिक संघटना, रिपब्लिकन पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहरातर्फे मागणी #rajgruh-attack

Share This
खबरकट्टा / ब्रह्मपुरी :अमर गाडगे -
 
भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक राजगृह निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्थ असून हे समाज विघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. 

राजगृहावर काही माथेफिरू समाजकंटकांनी हल्ला करून तोडफोड केली त्या इसमाची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासंबंधी चे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे. 

ब्रह्मपुरी तालुक्यातील सामाजिक व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे निवेदन देताना सर्वश्री डॉ. देवेश कांबळे, जीवन बागडे ,इंजि. मिलिंद मेश्राम, भीमराव बनकर ,संदीप रायपुरे, एन. आर. मेश्राम, विजय पाटील,प्रशांत डांगे, अभय रामटेके,मदन शेंडे,सुधाकर पोपटे,रवी गणवीर,नरेश रामटेके,अमित चाहांदे चंद्रशेखर मेश्राम अमर गाडगे, एडवोकेट नंदा फुले आदी सहभागी होते.

राजगृहावरील याच हमल्याचा भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहरातर्फे निषेध व कठोर कार्यवाहीची मागणी :

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक राजगृह निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्थ असून हे समाज विघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे व या मुळे समाजात अशांतता पसरविण्याचे हेतूने केलेले कृत्य अतिशय निषेधार्थ आहे  या घटनेचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहराच्या वतीने करण्यात आला. 

राजगृहावर काही माथेफिरू समाजकंटकांनी हल्ला करून तोडफोड केली त्या इसमाची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासंबंधी चे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनातून मागणी भारतीय जनता युवा मोर्चा  ब्रह्मपुरी च्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे निवेदन देताना युवा मोर्च्याचे अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, महामंत्री स्वप्नील अलगदेवे, रितेश दशमवार,सचिव दत्ता येरावार,उपाध्यक्ष प्रमोद बांगरे,पवन जैस्वाल,अरुण बनकर,सचिन मानगुदडे,रजत थेटे, हिरा मेश्राम आदी सहभागी होते.