"वृक्षरोपण- एक झाड एक संकल्प" : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी राहुल पावडे मित्रपरिवारचा निसर्ग सेवा संकल्प #rahul pawade #sudhir mungantiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"वृक्षरोपण- एक झाड एक संकल्प" : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी राहुल पावडे मित्रपरिवारचा निसर्ग सेवा संकल्प #rahul pawade #sudhir mungantiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असा ध्यास राज्याचे माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आहे. 

राज्यात 33 कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करून अनेक ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आल्या होत्या त्, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली हाच वारसा पुढे चालवत, "वृक्षरोपण- एक झाड एक संकल्प"या सेवाभावी कार्याचा काल दिनांक 30 जुलै, सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य चंद्रपूर शहरात श्री राहुल पावडे यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला. 
 
‘निसर्ग उत्तम ठेवला तर सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतात. सर्व प्रश्‍नांचे मूळ वृक्ष लागवडीत आहे. वनसंपदेवर मानवाची बरीचशी कामे अवलंबून असून वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.चंद्रपूर शहरातील वाढत्या प्रदूषणाला समतोलित ठेवण्याकरीता आम्ही सन्माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात विविध प्रयोग करत चंद्रपूर शहरात "वृक्षरोपण- एक झाड एक संकल्प" ही वृक्षारोपण ते वृक्षसंवर्धन संकल्पना राबविणार असल्याचे मत  श्री. राहुल पावडे, उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती यांनी व्यक्त केले. 

या संकल्पनेच्या शुभारंभापासून या पुढे सातत्याने राहुल पावडे मित्र परिवार शहरातील परिवारांना वृक्षलागवडीचे महत्व विशद करत वृक्षसंवर्धनास चालना देण्याचे सेवाकार्य नित्यनेमाने करीत राहील काम असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निसर्ग सेवा कार्यक्रमात चंद्रपूर महानगरात नगीनाबाग प्रभागात चैत्रबन ,शांती पार्क आणि ठीक ठिकाणी वृक्षारोपण  नगरसेवक प्रशांत चौधरी, सविता कांबळे, वंदना तिखे व प्रभागातील नागरिकांच्या उपस्थित करण्यात आले.