चंद्रपूर ब्रेकिंग : प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांना अटक : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीं तील एकदिवशीय बंद आंदोलनास पोहोचण्या आधीच गडचांदूर येथे अटक : पीडित कामगारांमध्ये कंपनी प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष #prahar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांना अटक : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीं तील एकदिवशीय बंद आंदोलनास पोहोचण्या आधीच गडचांदूर येथे अटक : पीडित कामगारांमध्ये कंपनी प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष #prahar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - 

अल्ट्राटेक  सिमेंट कंपनीकडून कामगार, स्थानिक बेरोजगार तथा शेतक-यांवर होत असलेल्या अन्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवार, 11 जुलै रोजी नांदाफाटा येथे एक दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे.

आज सकाळीच 6 वाजताच्या आसपास नांदाफाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी गेट समोर धरणा देण्यास जात असलेल्या प्रहार प्रतिनिधी सूरज ठाकरे यांची गाडी  पोलीस प्रशासनाने गडचांदूर येथेच रोखून आंदोलन स्थळी पोहोचण्या आधीच अटक केल्याने कंपनी परिसरात आंदोलनाकरीता पोहोचलेल्या कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 

आज सकाळीच आंदोलन स्थळी पोहोचत असताना सूरज ठाकरे यांना अडविण्याकरिता गडचांदूर येथे मुख्य मार्गावर बॅरिकेट्स लावून रस्ता अडविण्यात आला होता. ठाकरे यांचे वाहन तेथे पोहोचताच त्यांना आंदोलन स्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला. ठाकरे हे जुमानत नाही बघून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन राजुरा पोलीस उपविभागीय कार्यालयात ठेवले असल्याचे वृत्त आहे. 

नांदाफाटा येथील उल्ट्राटेक (एल अॅन्ड टी )सिमेंट कंपनी प्रशासानाने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत कायमस्वरूपी समावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही २० प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच टाळेबंदी काळात कामगारांना वेतन देण्यात आलेले नाही. 

कंपनीकडून सीएसआरफंडातून कामे करण्यात येत नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कंपनी प्रशासनाविरोधात शनिवारी बंद पुकारण्यात आला होता मात्र आंदोलनाच्या पुढाऱ्यालाच आंदोलन स्थळी न पाहोचू देणे हे कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे मत पिडीतांनी व्यक्त केले.