: शिक्षण विभागातील मुख्य लिपिक यांचे वर अँटी करप्शन ब्युरो ची कार्यवाही : प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांचा दणका #prahar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

: शिक्षण विभागातील मुख्य लिपिक यांचे वर अँटी करप्शन ब्युरो ची कार्यवाही : प्रहार प्रतिनिधी सुरज ठाकरे यांचा दणका #prahar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या सुरज ठाकरे यांच्या पुढाकाराने शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथील मुख्य लिपिक उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव वय 52 वर्षे यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करण्शन ब्युरोच्या नागपूर पथकाने रंगेहात पकडले आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, जिवती तालुक्यातील नंदाप्पा गावातील  प्रांजली माध्यमिक विद्यालय याठिकाणी पीडित तक्रार कर्ता,  कोरपना निवासी प्रमोद मडावी वय 35 वर्षे हे 2011 पासून चपराशी या पदावर कार्यरत आहेत. एक जुलै 2018 पासून या शाळेला शासनाकडून 20 टक्के अनुदान प्राप्त झाले. 

यानुसार प्रमोद मडावी यांनी शाळेतील मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून त्यांना नियमित वेतन मिळावे याकरिता नागपूर येथील उपसंचालक शिक्षण विभाग यांचेकडे प्रस्ताव डिसेंबर 2018 रोजी सादर केला, परंतु हा प्रस्ताव तेथील मुख्य लिपिक उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव यांनी आपल्याकडेच यांबवून ठेवला व मुख्याध्यापक राठोड यांच्या माध्यमातून तक्रार करता व पीडित प्रमोद महावी यांना 50,000/- रुपयांच्या लाचेची मागणी केली ही मागणी पूर्ण झाल्यानेतरच तुमचा प्रस्ताव मी पारित करून देईल असे सांगितले.

श्री, प्रमोद मडावी यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने प्रमोद महावी यांनी श्री मिलिंद सोनटके प्रहार कार्यकर्ता गडचांदूर यांना संपर्क केला, त्यांना सर्व प्रकरणाची माहिती दिली व त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री. सुरज ठाकरे यांना संपर्क करुन सर्व प्रकरण सांगितले त्यावेळी सुरज ठाकरे यानी सदर व्यक्ती हा कुठे मिळेल असे विचारणा केल्यानंतर प्रमुख लिपिक श्रीवास्तव यांनी प्रमोद मडावी यांना पैसे घेऊन नागपुर बेथील उपसंचालक शिक्षण विभाग यांचे कार्यालय धंतोली येथे येण्यास सांगितले.

त्याप्रमाणे प्रमोद मडावी मिलिंद सोनटक्के यांना घेऊन सुरज ठाकरे यांनी सर्वप्रथम लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक श्री. राजेश दुद्धलवार पाना संपर्क केला व लेखी तकार श्री प्रमोद महावी यांना करायला लावली व श्री. दुद्धलवार, यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक सौ. संजीवनी घोरात पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबळे, पोलीस शिपाई प्रभाकर बले, अमर गणवीर भागवत वानखेडे , महिला पोलीस शिपाई रे पादव निशा उमरीकर यांच्या टीमने सापळा रचून प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरज ठाकरे यांच्या सहकार्याने लाच घेताना शिक्षण विभागाचे मुख्य लिपिक उपेंद्र शरच्चंद्र श्रीवास्तव यांना रंगेहात पकडले आहे.

यामुळे तक्रार करता प्रमोद मडावी यांचे गेल्या दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक अडवून ठेवलेले कागदपत्र हे प्रमोद महावी यांना तात्काळ प्राप्त झाले व त्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा झाला व गेल्या दोन वर्षांपासून अडकून असलेल्या पगार हा देखील त्यांना मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

कुठल्याही प्रकारच्या शासकीय कामांकरिता कुणीही लाच मागितल्यास प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर कार्यालय येथे संपर्क करावा असे आवाहन श्री. सुरज ठाकरे यांनी यावेळी जनसामान्यांना केले आहे.तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुख्यमंत्र्यांचे सचिवालय नागपूर याठिकाणी देखील येऊन तक्रार करावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीसा अधीक्षक श्री दुद्धलवार यांनी यावेळी केले.