वृद्ध दांपत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले #old age couple found dead - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वृद्ध दांपत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले #old age couple found dead

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती -

भद्रावती तालुक्यातील चोरा येथील शेत शिवारातील घरात कुजलेल्या अवस्थेत वृद्ध पती-पत्नीचा एकाच ठिकाणी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे प्राथमिक अंदाजानुसार ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचे सांगण्यात आले असून येथील नागरिक घातपात झाल्याची शंका व्यक्त करीत आहे. 

यातील गजानन आसुटकर वय 62वर्ष व शिला आसुटकर वय 55 वर्ष राहणार चोरा असे मृतकाचे नाव आहे यांची चोरा पासून दोन किमी अंतरावर शेती असून या शेतातील घरात दोघेही पती-पत्नी राहत होते यांना चार मुले असून दोन सरकारी नोकरी मध्ये तर दोघे भद्रावती येथे व्यवसाय करत आहे. 

गेल्या दोन दिवसापासून या परिसरात दुर्गंधी येत असल्याने येथील काही नागरिकांनी आसुटकर यांच्या घराजवळ बघितले असता वृध्द खाटेवर तर महिला जमिनीवर मृत अवस्थेत दिसले यांचे शरीर कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी येत होती या घटनेची माहिती ठाणेदार सुनील सिंग पवार यांना मिळतात हे घटनास्थळी दाखल झाले. 

मृतांचे शरीर कुजली असल्याने त्यांचे शवविच्छेदन डॉक्टर सातभाई यांनी घटनास्थळीच केले ही घटना लक्षात घेता घातपातानेच यांचा मृत्यू झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेचा पंचनामा तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच घटनेचे कारण लक्षात येईल असे ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी सांगितले.