ब्रेकिंग : मुलाने केली वडिलांची हत्या : मानसिक जाचाला कंटाळून केले कुऱ्हाडीने वार #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : मुलाने केली वडिलांची हत्या : मानसिक जाचाला कंटाळून केले कुऱ्हाडीने वार #murder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

वडिलांच्या जाचाला कंटाळून मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. 

सविस्तर माहिती नुसार चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथील श्रावण चौधरी, त्याचा मुलगा नागेश चौधरी आणि पत्नी व मुलगी असा परिवार राहत होता, मुलगी नागपूरला व मुलगा सुद्धा बाहेर शहरात कामासाठी राहत होता पण लॉक डाऊन च्या काळात मुलगा आणि मुलगी आई बाबा कडे मागील तीन महिन्यापासून एकत्र राहत होती. 

दरम्यान श्रावण चौधरी हा आपल्या पत्नीला व मुलीला वारंवार शिव्या देवून मानसिक व शारीरिक त्रास द्यायचा त्यामुळे काल दिनांक 5  जुलै ला दुपारी मुलगा नागेश याचा वडिलांच्या या भांडणामुळे राग अनावर झाल्याने त्याने घरातील कुर्हाडीने आपल्या बापाच्या डोक्यावर वार करून जागीच ठार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आरोपी नागेश चौधरी याला अटक केली असून अधिक तपास दूर्गापूर पोलिस करीत आहे .