तीन दिवसांत दुसरा खून!: सलग दोन खुनांनी ब्रम्हपुरी शहर हादरले #murder-series-at-bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तीन दिवसांत दुसरा खून!: सलग दोन खुनांनी ब्रम्हपुरी शहर हादरले #murder-series-at-bramhapuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी 
       
शहराला लागून असलेल्या खेडमक्ता येथील घटना ताजी असतांनाच रविवारी सकाळी शहरातील भरचौकात एका वयोवृध्द इसमाने वार्डातीलच एका युवकावर धारदार शस्त्राने छातीवर वार करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी  अवस्थेत मृतक युवकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना काही वेळातच गंभीर जखमी युवकाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शहरातील धुम्मनखेडा वार्डात रविवारी सकाळी 8:30 वाजेदरम्यान घडली.
          
प्राप्त माहितीनुसार मृतक युवकाचे नाव रामचंद्र आनंदराव पिलारे (45) असून ब्रम्हपुरी शहरातील (धुम्मनखेडा) वार्डातील रहिवासी आहे मृतक युवक सकाळी नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारत असतांना यातील आरोपी रामू तुळशीराम बावणे (65) धुम्मनखेडा वार्ड याने जुन्या वैमनस्यातून अचानक काही कळायच्या आत लोहार बनविण्याच्या दुकानातून आणलेल्या धारदार शस्त्राने छातीवर वार केला.

त्यात सदर हल्ल्यात मृतक युवक घटनास्थळी गंभीर जखमी झाला सदर घटनेची माहिती आसपासच्या नागरिकांना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी युवकास तात्काळ शहरातील 'आस्था' रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु मृतक युवकावर उपचार सुरु असतांनाच सकाळी 11 वाजता मृत पावला.

ब्रम्हपुरी पोलिसांनी आस्था रुग्णालयात जाऊन पंचनामा केला व शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले असून कलम 302 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विन खेडीकर करीत आहेत.