चंद्रपूर शहर विकासासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून द्या - मनपा पदाधिकारी ; प्रशासनाची मागणी #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर शहर विकासासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून द्या - मनपा पदाधिकारी ; प्रशासनाची मागणी #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरोनामुळे सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. महापालिकेची करवसुली झाली नाही. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. विकासकामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने विकासकामांकरिता 10 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे. तसेच टाळेबंदी काळातील तीन महिन्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी महापौर राखी कंचर्लावार यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. प्रत्येक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. अनेकांना मालमत्ता कर भरणे शक्य नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने डिसेंबरपर्यंत कर भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. कर वसुली होऊ न शकल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली.

यावेळी उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, महिला व बालकल्याण सभापती शीतल गुरनुले, उपसभापती चंद्रकला सोयाम, झोन सभापती प्रशांत चौधरी, कल्पना बगुलकर, नगरसेवक संजय कंचर्लावार, संदीप आवारी, रवी आसवानी, जयश्री जुमडे उपस्थित होते.