भाजप नगरसेवक रवी आसवानी यांना दारुतस्करीत अडकविण्याचा प्रयत्न? : नेमकी आसवानींच्याच वॉल कंपाउंड वर दारू पेटी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कशी?? #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजप नगरसेवक रवी आसवानी यांना दारुतस्करीत अडकविण्याचा प्रयत्न? : नेमकी आसवानींच्याच वॉल कंपाउंड वर दारू पेटी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कशी?? #mncchandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

चंद्रपूर महानग पालिकेचे भाजपचे नगरसेवक रवी आसवानी यांना दारूतस्करीत अडकविण्याचा रामनगर पोलिसांचा प्रयत्न फसला. शहरात कडकडीत टाळेबंदी असताना आसवानी यांच्या घराच्या वॉलकंपाउडवर अनोळखी व्यक्तीने विदेशी दारूचा पेटी ठेवली. 

ती आसवानी यांचीच असल्याच्या संशयावरून पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, आसवानी यांनीच पोलिसांना सुनावल्यानंतर ते दारू घेऊन माघारी फिरले. मात्र, दारूची पेटी फसविण्यासाठी जाणीवपूर्वक ठेवली असावी, असा संशय आसवानी कुटुंबीयांचा आहे.

रामनगर परिसरात सिंधी कॉलनीत नगरसेवक रवी आसवानी यांचे घर आहे.सध्या चंद्रपुरात टाळेबंदी आहे. त्यामुळे कुणी घराबाहेर पडत नाही. दुपारी एक वाजताच्या सुमाराला या वस्तीत शुकशुकाट होता. बहुतांश कुटुंबीय घरात होते. 


आसवानीसुद्धा दुपारी कुटुंबीयांसह विश्राम करीत होते. घरात त्यांचा मुलगा आणि पत्नी होती. दरम्यान 1.15 मिनिटांनी अचानक दोन पोलिस आसवानी यांच्या घरी पोहोचले. तुम्ही दारूची अवैध विक्री कधीपासून सुरू केली, अशी थेट विचारणा आसवानी यांना केली. तेव्हा सारेच कुटुंबीय चक्रावले. पोलिसांनी त्यांच्या घराच्या वॉलकंपाउडवर असलेली विदेशी दारूची पेटी आसवानी यांना दाखविली. 

तोपर्यंत रामनगरचे आणखी काही पोलिस तिथे पोहोचले. आसवानी यांनीही नमते घेतले नाही. त्यांनीही पोलिसांना खडे बोल सुनावले. दरम्यान, पोलिस पोहोचण्याच्या काही मिनिटाअगोदर एक महिला दाखला मागण्यासाठी आसवानी यांच्या घरी आली होती. तेव्हाच आसवानी यांनी घराचे द्वार उघडले. त्यावेळी आसवानी घरातच होते. ती आल्यानंतरच त्यांनी दार उघडले असे सांगितले. त्यानंतर पोलिस नरमले. वॉलकंपाउडवर कुणीतरी जाणीवपूर्वक ती दारूची पेटी ठेवली, अशी त्यांनी खात्री पटली. 

दुचाकीवर कुणीतरी दारू घेऊन आसवानी यांच्या घराकडे घुसला आणि त्यानेच ती दारूची पेटी वॉलकंपाऊडवर ठेवली, असे पोलिसांनी मान्य केले. त्यानंतर दारू घेऊन ते माघारी फिरले. मात्र, या घटनेमुळे आसवानी कुटुंबीय चांगलेच हादरले आहे. आसवानी यांचे घर गल्लीत शेवटचे आहे. त्यानंतर जायला रस्ता नाही. आल्या मार्गानेच एखाद्याला परत जावे लागले. आसवानी यांच्या रांगेत आधी पाच ते सहा घर आहे. तिथे दारू न ठेवता आसवानी यांच्याच घराच्या वॉलकंपाऊडवर दारू ठेवली कशी? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

माझ्या कुटुंबीयांना फसविण्यासाठी जाणीवपूर्वक विदेशी दारूची पेटी वॉलकंपाऊडवर ठेवली. पोलिस घरी पोहचले. सुदैवाने त्यांची खात्री पटली आणि ते माघारी फिरले. याप्रकरणाची चौकशी करून आरोपीला पोलिसांनी पकडायला हवे. - रवी आसवानी, नगरसेवक, मनपा चंद्रपूर