चंद्रपूर मनपा कर्मचारी कोरोना बाधित : आज सकाळी प्राप्त झाला पॉसिटीव्ह अहवाल : लवकरच सर्व कर्मचाऱ्यांची होणार तपासणी - श्री. राजेश मोहिते( आयुक्त, मनपा, चंद्रपूर ) #mnc chandrapur employee found positive - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर मनपा कर्मचारी कोरोना बाधित : आज सकाळी प्राप्त झाला पॉसिटीव्ह अहवाल : लवकरच सर्व कर्मचाऱ्यांची होणार तपासणी - श्री. राजेश मोहिते( आयुक्त, मनपा, चंद्रपूर ) #mnc chandrapur employee found positive

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात +

चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयातील झोन विभागात पूर्ण कालीन कार्यरत कर्मचारी आज सकाळी कोरोना पॉसिटीव्ह निघाल्याने मनपा कार्यालयात खळबळ उडाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

मनपा आयुक्त श्री. राजेश मोहिते यांचेशी टीम खबरकट्टा ने संपर्क साधला असता सदर कर्मचारी हा शहरातील जटपुरा गेट परिसरातील दुर्गा माता मंदिर जवळ रहिवासी असलेला कर विभागात कार्यरत कर्मचाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल काल रात्री उशिरा (आज सकाळी ) पॉसिटीव्ह प्राप्त झाला. 

त्या अनुषंगाने या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे, सोबतच पालिकेतील इतर सर्व पदाधिकारी, कर्मचारी व भेटीस येणाऱ्या अभ्यंगताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


मनपा सफाई कामगारांच्या कोरोना तपासणी टप्प्यात सुरु असून आता कार्यालयीन सर्व कर्मचाऱ्यांच्याही तपासण्या लवकरच केल्या जाईल असेही मोहिते यांनी सांगितले.