बाळू- बी ए पार्ट ऑफ लविंग युनिट :तर चला कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करू या....... आपल्या भारताला समृद्ध करूया....... #malnutrition - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाळू- बी ए पार्ट ऑफ लविंग युनिट :तर चला कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करू या....... आपल्या भारताला समृद्ध करूया....... #malnutrition

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सामाजिक -


जिल्हा परिषद चंद्रपुर पंचायत समिती अंतर्गत राजुरा येथील पंचायत विस्तार अधिकारी श्री. अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा अभिनव उपक्रम
मित्रांनो आपण आपले वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस व अनेक प्रसंगी हजारो रुपये खर्च करून साजरे करीत असतो. त्यात थोडी काटकसर करून आपण आपल्या परिसरातील, वार्डातील, गावातील, राज्यातील आणि देशातील कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढु शकतो. 

बाळू बी ए पार्ट ऑफ लविंग युनिटचे संस्थापक अमित महाजनवार विस्तार अधिकारी पंचायत यांची संकल्पना  नावारूपास आली आणि संपूर्ण जिल्ह्यात अल्पावधीतच प्रकाशझोतात सुद्धा आली. आजपर्यन्त300 च्या वर बालके व गरोदर मातांना या उपक्रमातून लाभ देण्यात आला.

आजची हि कुपोषित बालके आपल्या उद्याचा भारताचे भविष्य आहेत.

तर चला कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करू या....... 
आपल्या भारताला समृद्ध करूया....... 
कुपोषित बालकांना वर्षभर पोषण आहार देण्याकरिता येणारा खर्च प्रत्येकी 1000/- रुपये

संपर्क : श्री. अमित महाजनवार, विस्तार अधिकारी पंचायत समिती, राजुरा. जि. चंद्रपूर 
मो. क्रमांक : 8275553501