🐛येथे मिळाल्या शिव भोजनात अळ्या #The larvae in the Shiva meal found here - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

🐛येथे मिळाल्या शिव भोजनात अळ्या #The larvae in the Shiva meal found here

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर / घुग्घुस :  

शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची  महत्वकांक्षी शिव भोजन  योजना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे  शासन येताच अंमलात आणल्या गेली या योजनेद्वारे  गोर गरीब नागरिकांना भोजन मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पाच रुपयात भोजन देण्यात येत आहे.
 
शिवभोजन रेल्वे परिसर ,बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय इमारत,व जिल्हा रुग्णालये या ठिकाणी दुपारी बारा ते दोन च्या वेळात देण्याचा शासनाचा नियम आहे घुग्घुस येथे 2 नंबर रोडवर श्रीराम वॉर्डात रमाबाई महिला बचत गटाला शिव भोजन केंद्र देण्यात आले.

महत्वाची विशेष बाब म्हणजे ही शिवभोजन सांभाळणारी महिला एका राजकीय पक्षाची अगदी जवळची असून या एकाच बाईला शिव भोजन व्यतिरिक्त अजून दोन ठिकाणी जेवण बनविण्यासाठी राजकीय बाप - दादांच्या आशीर्वादाने कंत्राट मिळाले आहेत.

घुग्घुस येथील शिवभोजन केंद्रातुन काही व्यक्तींनी पार्सल भोजन घरी नेले व मुलाला जेवण दिले असता त्याला भाजी मध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नागरिकांच्या जीवनाशी खेळल्या जात असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात असून दोषींवर कारवाईची सर्व स्तरातून मागणी होत आहे.