नारंडा येथे जय शिवराय क्रीडा मंडळाला कबड्डी किटचे वाटप :भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या हस्ते वितरण #kabaddi kit - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नारंडा येथे जय शिवराय क्रीडा मंडळाला कबड्डी किटचे वाटप :भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या हस्ते वितरण #kabaddi kit

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

कोरपना तालुक्यातील नारंडा येथे जय शिवराय क्रीडा मंडळाला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या हस्ते कबड्डी किटचे खेळाडूंना वितरण करण्यात आले.
             
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे,तसेच ग्रामीण क्षेत्रातून नवीन चेहरे कबड्डीमध्ये समोर आले पाहिजे तसेच त्यांच्या क्रीडा गुणांना चालना मिळावी याकरिता कबड्डीचे जय शिवराय क्रीडा मंडळाला वाटप करण्यात आले असे भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी सांगितले.
     
यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,नारंडा येथील उपसरपंच अनिल शेंडे,सत्यवान चामाटे,अजय तिखट,प्रवीण हेपट,अरुण निरे,संतोष वांढरे,मंगेश तिखट,अजय वांढरे, अविनाश वांढरे,प्रशांत शेंडे,योगेश शेंडे,रोशन गुरनुले, लोकेश मोहूर्ले, सौरभ भोंगळे, मारोती वाढई, राजेश कुचनकर,अमोल कुचनकर,मनोज शेंडे,मनोज कुडमेथे उपस्थित होते.