. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने महावितरणचे सिंदेवाही ग्रामीण शाखा कार्यालय पाथरी येथे स्थलांतरित ग्राहकांना तात्काळ करता येणार संपर्क #diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने महावितरणचे सिंदेवाही ग्रामीण शाखा कार्यालय पाथरी येथे स्थलांतरित ग्राहकांना तात्काळ करता येणार संपर्क #diochandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

महावितरणचे ग्रामीण शाखा सिंदेवाही येथे कार्यालय होते. या कार्यालया अंतर्गत सावली तालुक्यातील 40 ते 41 गावे समाविष्ट आहेत. त्यामुळे या गावातील ग्राहकांच्या वीज वितरण संदर्भात समस्या, तक्रारी दाखल करण्यासाठी अर्थात ग्राहकांच्या संपर्कासाठी त्रास होत होता. हा त्रास होऊ नये यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने महावितरणचे सिंदेवाही ग्रामीण शाखा कार्यालय सावली तालुक्यातील पाथरी येथे 33/11 केव्ही उपकेंद्रामध्ये स्थलांतरित झाले आहे.

सिंदेवाही ग्रामीण शाखा कार्यालयांतर्गत एकूण 11 हजार 814 ग्राहकांपैकी पाथरी परी क्षेत्रात 8 हजार 807 ग्राहक संख्या येत असून पाथरी गाव मध्यवर्ती ठिकाण असल्याने ग्राहकांना संपर्कासाठी त्रास होणार नाही. सिंदेवाही ग्रामीण शाखा कार्यालयाचे मुख्यालय मौजा पाथरी येथे स्थलांतरित करण्याकरिता मुख्य अभियंता यांनी मंजुरी प्रदान केली आहे.

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रस्तावाबाबत पाठपुरावा करून तसेच तात्काळ बैठक घेऊन सिंदेवाही ग्रामीण शाखा कार्यालयाचे मुख्यालय मौजा पाथरी येथे स्थलांतरित करण्याबाबतचे निर्देशित केले होते. त्यानुसार कार्यालय सावली तालुक्यातील मौजा पाथरी येथे 33/11 केव्ही उपकेंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ सुनील देशपांडे यांनी दिली आहे.