ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांचा अपघात..#devendra-fadanvis-meet-with-accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांचा अपघात..#devendra-fadanvis-meet-with-accident

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने हे दोन्ही नेते सुखरुप आहेत. दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या घरी जाताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जळगावच्या घरी जात होते. त्याचवेळी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने त्यांची गाडी समोरच्या गाडीवर आदळली. त्यामुळे हा अपघात झाला. 

 माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी जिल्हा दौऱ्यावर आले असता ते स्वर्गीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या भालोद येथील निवासस्थानी जात असताना नशिराबाद टोलनाक्याजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनाला किरकोळ अपघात झाला. या अपघातात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत. 

विरोधी पक्षनेते फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन हे एकाच कारमधून जात होते. तर त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही कार होती. दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता. पावसाचा अंदाज न आल्याने दरेकर यांच्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. 

यावेळी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरली. या अपघातात दरेकर यांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कारची तपासणी केली. तसेच पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. तत्पूर्वी ताफा पुढे रवाना झाला होता.