संशयास्पद स्थितीत आढळले मृतक इसमाचे शव घातपात असल्याची शंका #dead body found at bramhpuri suicide or murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संशयास्पद स्थितीत आढळले मृतक इसमाचे शव घातपात असल्याची शंका #dead body found at bramhpuri suicide or murder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

ब्रम्हपुरी नागभीड महामार्गावरून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला खेड गावाच्या टोलीजवड आज दि 17 ला पहाटे एक इसमाचा मृतदेह आढडून आला.सदर प्रकार हा घातपात असल्याची शंका वर्तवली जात आहे.
            
मृतक चंद्रभान मडुजी झरकर 38 हा मागील दोन वर्षांपासून नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथे वास्तव्यास राहत असल्याची प्राथमिक माहिती असून 2-3 दिवसापासून तो खेड गावी आला होता.

मृतकाचे खेड येथे शेत व घर सुद्धा आहे.खेड वरून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बाजूला  आज दि 17 ला पहाटे सदर इसमाचा प्रेत पडून असल्याचे काही लोकांना दिसले.घटना स्थडावरील परिस्थिती लक्षात घेता हा प्रकार घातपात असल्याचे बोलल्या जात आहे.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुरवसे मॅडम करीत आहेत.